तामिळनाडूतही १ जानेवारी २०१९ पासून प्लास्टिक बंदी

प्लास्टिकच्या पिशव्यांसह प्लास्टिकच्या वस्तूंवर तमिळनाडू सरकारने पुढील वर्षी म्हणजेच १ जानेवारी २०१९ पासून बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी विधानसभेत प्लास्टिक बंदीबाबत घोषणा केली.

या निर्णयामुळे १ जानेवारी २०१९ पासून प्लास्टिक निर्मिती, विक्री, साठा आणि प्लास्टिक पेपर, कप, पिण्याचे पाणी विकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिशव्या, स्ट्रॉ आणि इतर प्लास्टिक पिशव्यांवरही बंदी लागू होईल.

तमिळनाडू सरकारने प्लास्टिक बंदीबाबत घेतलेला हा पहिलाच निर्णय नसून मुख्यमंत्रिपदावर असताना जे. जयललिता यांनी २००२ मध्ये सर्वप्रथम प्लास्टिक बंदी जाहीर केली होती.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: