डॉ. चांद यांना व्यवस्थापन क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार प्रदान

नाल्को (NALCO – National Aluminium Company) म्हणजेच नॅशनल ॲल्युमिनिअम कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. तपन कुमार चांद यांना यंदाचा प्रतिष्ठित एनआयपीएम रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

राष्ट्रीय कर्मचारी व्यवस्थापन संस्थेच्या पुणे येथे झालेल्या 37 व्या राष्ट्रीय परिषदेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

लोक व्यवस्थापन आणि नेतृत्व कौशल्य या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले.

डॉ. चांद यांनी आपला पुरस्कार देशभरातील मनुष्यबळ क्षेत्रातल्या व्यावसायिकांना आणि नाल्कोच्या संपूर्ण समूहाला समर्पित केला आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: