डॉ. किसन महाराज साखरे यांना ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार

राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन 2017-18 चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा डॉ.किसन महाराज साखरे यांना घोषित करण्यात आला आहे.

संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य लिहिणार्‍या किंवा संतांना अभिप्रेत असलेल्या मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

5 लाख रुपये रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरुप आहे.

डॉ.किसन महाराज साखरे -

डॉ.किसन महाराज साखरे हे संत वाड्मयावर अध्यापन करत असून गेली गेली 57 वर्षापासून अनेक मासिकांमधून तसेच वृत्तपत्रांमधून उपनिषदांपासून ते संत वाड्मयावर लेखन करीत आहेत.

संत ज्ञानदेव अध्यासन समितीचे अध्यक्ष व त्या समितीद्वारे त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये  श्री ज्ञानदेव अध्यासनाची निर्मिती केलेली आहे.

ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ही त्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमातून दृकश्राव्य रुपात ती इंटरनेट (Internet) वर उपलब्ध करुन  देण्याचा पहिला प्रकल्प त्यांनी पूर्ण केलेला आहे.

1990 साली त्यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी पावणेतीन क्विंटल ताम्रपटावर कोरुन एक चिरंजीव प्रकल्प पूर्ण केलेला आहे. संत साहित्यातील योगदानाबद्‌दल त्यांना टिळक विद्यापीठाकडून डी.लीट पदवी प्रदान करण्यात आली आहे तर डी.लीटसाठी होणाऱ्या परीक्षांसाठी त्यांनी परिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: