टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया(ट्राय)

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) मोबाइल धारकांना नको असलेल्या म्हणजेच त्रासदायक ठरणाऱ्या कॉल आणि एसएमएसच्या समस्येचे निराकरण केले आहे.

नवीन नियमांतर्गत, ग्राहकांच्या परवानगीशिवाय अशाप्रकारच्या कॉल आणि एसएमएसवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच मार्केटिंगशी निगडीत कॉल आणि एसएमएस केवळ नोंदणीकृत संस्थेकडूनच पाठवले जातील याची दक्षता घेण्याचे आदेश टेलीकॉम कंपन्यांना ट्रायने दिले आहेत.

नियमांचं उल्लंघन केल्यास दंडाचीही तरतूद करण्यात आली असून १ हजार रुपयांपासून ५० लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

नवीन नियमांतर्गत मेसेज सेंडर्स (मेसेज पाठवणारे) आणि हेडर्स (वेगवेगळ्या पद्धतीच्या मेसेजेसचे वर्गीकरण करणारे) यांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे , तसंच हे मेसेज पाठवण्याआधी ग्राहकांची परवानगी घेणं बंधनकारक करण्यातआले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: