ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार

संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा आणि सन २०१७-१८ साठी जाहीर झालेला ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार शुक्रवारी 31 ऑगस्ट रोजी डॉ.किसन महाराज साखरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. गतवर्षीचे या पुरस्काराचे मानकरी ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ.किसन महाराज साखरे यांना प्रदान केला जाणार आहे.

पुरस्कार – 

ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार २०१७-२०१८

कोणाकडून दिला जातो –

महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक वर्षी प्रदान केला जातो.

कशासाठी दिला जातो  –

संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्या वतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

स्वरुप-

रुपये ५ लक्ष रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

या पुरस्काराचे आजपर्यंतचे मानकरी –

हा पुरस्कार यापूर्वी रा. चिं. ढेरे, डॉ.दादा महाराज मनमाडकर, जगन्नाथ महाराज नाशिककर, रामकृष्ण महाराज लहवितकर, डॉ. यू. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, मारोती महाराज कुऱ्हेकर, डॉ. उषा देशमुख आणि ह.भ.प निवृत्ती महाराज वक्ते यांना प्रदान करण्यात आला आहे.

डॉ. किसन महाराज साखरे –

डॉ. किसन महाराज साखरे हे संत वाड्.मयावर अध्यापन करत असून गेली ५७ वर्षापासून अनेक मासिकांमधून तसेच वृत्तपत्रांमधून उपनिषदांपासून ते संत वाड्.मयावर लेखन करीत आहेत. संत ज्ञानदेव अध्यासन समितीचे अध्यक्ष व त्या समितीद्वारे त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये श्री ज्ञानदेव अध्यासनाची निर्मिती केलेली आहे.

आकाशवाणीवर त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्यदेखील केलेले आहे. ज्ञानेश्वरीच्या वेदनिष्ठा, सो्‌हम योग, योगत्रयी प्रवचनमालांवर त्यांनी१०० हून अधिक ग्रंथांचे संपादन केलेले आहे.

महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळावर त्यांनी सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ही त्यांनी मराठी,हिंदी व इंग्रजी माध्यमातून दृकश्राव्य रुपात इंटरनेट (Internet) वर उपलब्ध करुन देण्याचा पहिला प्रकल्प पूर्ण केलेला आहे.

१९९०साली त्यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी पावणेतीन क्विंटल ताम्रपटावर कोरुन एक चिरंजीव प्रकल्प पूर्ण केलेला आहे.

संत साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी. लिट पदवी प्रदान करण्यात आली आहे तर डी. लिटसाठी होणाऱ्या परीक्षांसाठी त्यांनी परीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: