जैव इंधनावर चालणारे भारताचे पहिले विमान

भारताच्या पहिल्या जैव इंधनावर चालणाऱ्या विमानाचे सोमवारी यशस्वी उड्डाण झाले. डेहराडून येथून उड्डाण केल्यानंतर हे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितरित्या उतरले.

स्पाईस जेट या भारताच्या विमान सेवा देणाऱ्या कंपनीने हे चाचणी उड्डाण केले.

या विमानात ७५ टक्के एव्हिएशन टर्बाइन फ्युएल तर २५ टक्के बायो फ्युएल (जैव इंधन) वापरण्यात आले होते. या इंधन प्रकाराची विमानोड्डाण चाचणी यशस्वी झाल्यानंतर याचा देशांतर्गत वापर वाढवण्यावर भर देण्यात येऊ शकतो.

जेट्रोफा या वनस्पतींच्या बियांपासून हे इंधन तयार करण्यात आले आहे.

यापूर्वी फक्त अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यानंतर आता भारतानेही हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. हे आव्हान पूर्ण करणारा भारत हा पहिला विकसनशील देश ठरला आहे.

१० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे जैव इंधन धोरण जाहीर केले होते. त्यावर काल यशस्वीरीत्या अंबलबजावणी करण्यात आली.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: