जीडीपी वाढीच्या अंदाजामध्ये घट

मूडीज रेटिंग या जागतिक स्तरावरील पतनिर्धारण संस्थेने भारताच्या जीडीपी वाढीच्या अंदाजामध्ये घट केली आहे. या वर्षी भारताची अर्थव्यवस्था 7.5 टक्क्यांच्या दराने वाढेल असा अंदाज आधी वर्तवण्यात आला होता. मात्र, यात कपात करताना भारताची अर्थव्यवस्था 7.3 टक्क्यांनी वाढेल असा सुधारीत अंदाज मूडीजनं वर्तवला आहे.

खनिज तेलाच्या वाढलेल्या किंमतींमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसणार असल्याचे मूडीजने म्हटले आहे. 2019 मध्ये मात्र भारताची अर्थव्यवस्था 7.5 टक्क्यांच्या दरानेच वाढेल असा अंदाज मात्र कायम ठेवला आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: