“जिल्हा रस्ते सुरक्षा समिती”

रस्ते सुरक्षाविषयक जनजागृती करण्यासाठी देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात “जिल्हा रस्ते सुरक्षा समिती” नेमण्यात आली आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, संबंधित जिल्ह्यातील लोकसभा खासदाराच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली आहे.

एखाद्या जिल्ह्यात एकापेक्षा जास्त खासदार असल्यास त्यापैकी वरिष्ठ खासदार या समितीचे अध्यक्ष असतील.

संबंधित जिल्ह्यातील राज्यसभा खासदार या समितीत विशेष निमंत्रित असतील.

समितीमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापौर, जिल्ह्यातील सर्व आमदार आणि उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांचा समावेश असेल.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: