‘जिओ फोन २’ ‘जिओगिगा राऊटर’ आणि ‘जिओ गिगा टीव्ही सेट’

‘रिलायन्स इंडस्ट्रिज’ची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबईत गुरुवारी पार पडली.

या वेळी अंबानी यांनी ‘जिओ फोन २’ ‘जिओगिगा राऊटर’ आणि ‘जिओ गिगा टीव्ही सेट’ची घोषणा केली.

सर्वसामान्यांनी आपलेसे केलेल्या ‘जिओफोन’ची सुधारित आवृत्ती ‘जिओफोन २’च्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे.

या फोनची किंमत २,९९९ रुपये असून, त्यामध्ये व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि यूट्यूबची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सर्व सुविधांसाठी नोंदणीची सुरुवात १५ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: