जागतिक शिक्षक दिन

जागतिक शिक्षक दिन

जागतिक शिक्षक दिन हा दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

भावी पिढी समर्थ बनविण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनविणे हा या दिनाचा उद्देश आहे. युनेस्कोतर्फे हा दिवस इ.स. १९९४ पासून जगभर सुमारे १०० पेक्षा जास्त देशांमध्ये पाळला जात आहे.

या दिवशी इ.स. १९६७ मध्ये युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय श्रम संघटन यांनी “शिक्षकांचा दर्जा” या विषयावरील शिफारशीवर सह्या केल्या होत्या. एज्युकेशन इंटरनॅशनल या संघटनेतर्फे देखील हा दिवस जगभर पाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

इ.स. २०११ साली “लैंगिक समानतेसाठी शिक्षकांची भूमिका” हा विषय होता तर इ.स. २०१२ या वर्षासाठी ” शिक्षकांसाठी योग्य भूमिका घ्या” हा विषय घेण्यात आला होता.


२०१८ वर्षासाठीचा जागतिक शिक्षक दिन ”द राईट टू एज्युकशन मीन्स द राईट टू ए क्वालिफाइड टीचर” या विषयाखाली पाळला गेला आहे.  ४ आणि ५ ऑक्टोबर २०१८ रोजी पॅरिस (फ्रान्स) येथे ‘जागतिक शिक्षक दिन २०१८ आंतरराष्ट्रीय परिषदे’चे आयोजन केले होते.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: