जागतिक मानसिक आरोग्य दिन – 10 ऑक्टोबर

दरवर्षी 10 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ म्हणून पाळला जातो.

या वर्षीचा विषय – “यंग पीपल अँड मेंटल हेल्थ इन ए चेंजिंग वर्ल्ड”


मानसिक विकार हा जगभरात आढळणारा सामान्य विकार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगभरात मानसिक विकाराने ग्रस्त लोकांची संख्या अंदाजे 450 दशलक्ष आहे.

मानसिक विकारामध्ये, व्यक्तीच्या सभोवतालची परिस्थिती आणि त्या व्यक्तीची विचारसरणी यामध्ये जेव्हा तफावत निर्माण होते आणि ती व्यक्ती आलेल्या परिस्थितीला स्वीकारू शकली नाही, त्यावेळी हा विकार उद्भवतो. यामधून त्या व्यक्तीमध्ये असामान्य वर्तन तयार होते.

आजही भारतामध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागृती नाही आणि त्याअभावी भविष्यात याचा उद्रेक होण्याचे संकेत निर्माण झाले आहे. जनसामान्यांना हे समजने अत्यावश्यक झाले आहे की, हा आजार नसून ही एक स्थिती आहे.

त्यामुळे भारत सरकारने सन 1982 मध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम (NMHP) सुरू केले होते.

जागतिक मानसिक आरोग्य महासंघ (WFMH) –

अमेरिकेतील (ऑकोकन, व्हर्जिनिया) जागतिक मानसिक आरोग्य महासंघ (WFMH) यांच्याकडून 1992 साली पहिल्यांदा ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ पाळला गेला होता.

जागतिक मानसिक आरोग्य महासंघ (WFMH) ही मानसिक आरोग्यासंदर्भात एक जागतिक संघटना आहे. 1948 साली संघटनेची स्थापना करण्यात आली आणि याचे 150 हून अधिक देश सदस्य आहेत.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: