जागतिक पर्यावरण दिन: ५ जून

दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणं, समस्या, संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणं हा यामागचा मुख्य उद्देश होय. पर्यावरणासाठी पुरक निर्णय घेण्याची क्षमता लोकांमध्ये निर्माण व्हावी म्हणूनच पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.

२०१८ च्या जागतिक पर्यावरण दिनाचं यजमानपद भारताकडे आहे. प्लास्टिक प्रदूषणावर आळा घालणं ही यंदाच्या पर्यावरण दिनाची संकल्पना आहे.

पर्यावरण (Environment) हा शब्द मूळ फ्रेंच शब्द ‘Environ’ या शब्दापासून तयार झाला आहे. ‘Environ’ म्हणजे ‘Surrounding or encircle’. सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय.

सुरुवात

५ जून १९७२ या दिवशी स्टॉकहोम येथे बदलत्या वातावरणाची दखल घेत काही देशांची मंडळी एकत्र जमली. बदलते हवामान आणि पर्यावरण याची दखल घेण्यासाठी ही परिषद आयोजीत करण्यात आली होती. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९७४ पासून ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा करण्यात येऊ लागला.पर्यावरणाच्या संवर्धनात अधिकाअधिक देशांनी सहभागी व्हावं यासाठी १९८७ पासून दरवर्षी एकएक संकल्पना ठरवून वेगवेगळ्या देशाकडे जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद देण्यात येतं.२०१८ च्या जागतिक पर्यावरण दिनाचं यजमानपद भारताकडे आहे. प्लास्टिक प्रदूषणावर आळा घालणं ही यंदाच्या पर्यावरण दिनाची संकल्पना आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: