जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक

भारताचा 23 वर्षीय ओम प्रकाश मिथर्वालने दक्षिण कोरियात सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत 50 मीटर पिस्तुल प्रकारात 564 गुणांसह सुवर्णपदक जिंकले आहे.

या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी कनिष्ठ गटात पुरुषांच्या 50 मीटर पिस्तुल वैयक्तिक आणि सांघिक गटात ओम प्रकाश मिथर्वालने सुवर्णपदक जिंकले आहे.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा मिथर्वाल हा पहिलाच भारतीय नेमबाज आहे. स्पर्धेतील या प्रकारात 2014 साली जितू रायने रौप्यपदक जिंकून दिले होते. त्यानंतर पदक जिंकणारा मिथर्वाल हा पहिलाच भारतीय आहे.

गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत मिथर्वालने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याने 10 मीटर एअर पिस्तुल आणि 50 मी. पिस्तुल प्रकारांत कांस्यपदकं जिकंली होती. त्याने 10 मीटर पिस्तुल प्रकाराच्या पात्रता फेरीत 584 गुणांची नोंद करताना राष्ट्रकुल स्पर्धा विक्रमाशी बरोबरी केली होती.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: