जागतिक ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धेत हिमा दासला सुवर्णपदक

जागतिक ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या हिमा दासने २० वर्षाखालील मुलींच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे. तिच्या या कामगिरीमुळे जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील ४०० मीटर ट्रॅकसाठी सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय धावपटू ठरली आहे.

हिमाने ५१.४६ सेकंद इतका वेळ घेत ही शर्यत पूर्ण केली. या स्पर्धेत रोमानियाच्या अँड्रिया मिकलोसला (५२.०७ सेकंद) रौप्य व अमेरिकेच्या टेलर मान्सनला (५२.२८ सेकंद) कांस्यपदक मिळाले आहे. यापूर्वी हिमाच्या आधी कोणीही भारतीय महिला धावपटू प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक कोणत्याही स्तरावर विश्व अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकू शकलेली नाही.

जागतिक ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धा

IAAF कडून दर दोन वर्षांनी जागतिक ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ही स्पर्धा १९८६ पासून भरविण्यात येत आहे. २०१५ पासून या स्पर्धेचे नामकरण IAAF World U20 Championships असे करण्यात आले आहे.

२०१८ मध्ये १७ वी जागतिक ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धा फिनलँडमधील टेम्पेरे येथे आयोजित करण्यात आली आहे.

तर १६ वी जागतिक ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धा २०१६ मध्ये पोलंडमध्ये आयोजित करण्यात आली होती.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: