जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन – 10 सप्टेंबर

जगभरात 10 सप्टेंबर रोजी ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’ पाळला जातो. यावर्षी हा दिन ‘वर्किंग टुगेदर टु प्रिव्हेंट सुसाइड’ या विषयाखाली पाळला जात आहे.

भारताच्या राष्‍ट्रीय गुन्‍हे नोंदणी विभागाने (NCRB) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात महिलांच्या तुलनेत विवाहीत पुरुषांच्या आत्‍महत्येचे प्रमाण दुप्‍पट आहे. 2015 साली भारतात 1,33,623 लोकांनी आत्‍महत्या केल्या.

जगात प्रत्येक 40 सेकंदाला आत्महत्या करून एका व्यक्तीचा मृत्यू होतो आणि आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची संख्या 25 पट अधिक आहे. त्यामुळे आत्महत्या रोखण्यासाठी जनजागृती निर्माण करण्यासाठी या दिनी जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध संघ (IASP) विविध कार्यक्रमाचे आयोजन करतो.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: