जागतिक अंतराळ सप्ताह

2018 वर्षाचा जागतिक अंतराळ सप्ताह (World Space Week) 4-10 ऑक्टोबर या कालावधीदरम्यान “स्पेस युनाइट्स द वर्ल्ड” (म्हणजेच अंतराळ क्षेत्राद्वारे जागतिक ऐक्य साधणे) या विषयाखाली पाळला जात आहे.

यावर्षी जागतिक अंतराळ सप्ताह साजरी करणारी महाराष्ट्र राज्यातली नाशिक महानगरपालिका ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे.

पार्श्वभूमी –

1957 साली 4 ऑक्टोबर या तारखेला ‘स्पुतनिक 1’ या नावाचा कृत्रिम उपग्रह रशियाने अंतराळात पाठवला होता. तर 10 ऑक्टोबर 1967 या दिवशी संयुक्त राष्ट्रासंघाच्या सदस्य देशांनी एकत्रित येत एक करार केला. यात अंतराळाचा वापर माणसाच्या कल्याणासाठी आणि शांततेसाठी व्हावा आणि उपग्रहांचा वापर मानवाच्या कल्याणासाठी व्हावा असा करार करण्यात आला आहे. या घटनेच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने डिसेंबर 1999 मध्ये 4-10 ऑक्टोबर हा कालावधी जागतिक अंतराळ सप्ताह म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला.

विक्रम साराभाई यांच्या यांच्या पुढाकाराने 1975 साली भारतात दूरदर्शनसंचाद्वारे (TV) माहिती प्रसारणाचा पहिला प्रयोग यशस्वी झाला.

अंतराळ तंत्रज्ञानाच्या मदतीने जागतिक सुरक्षितता, भूकंप, त्सुनामी, हवामान, नैसर्गिक धोके आदींविषयी माहिती देणारे तंत्रज्ञान विकसित करण्यातही मोलाची भूमिका बजावली आहे.

आतापर्यंत ISROने 168 मोहिमा केल्या असून त्यापैकी 45 यानांचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: