जनरल मोटार्सच्या CFO पदावर दिव्या सूर्यदेवरा

भारतीय वंशाच्या दिव्या सूर्यदेवरा यांची अमेरिकेची प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी जनरल मोटर्सच्या मुख्य वित्त अधिकारीपदी (CFO) नियुक्ती करण्यात आली आहे. ३९ वर्षीय सूर्यदेवरा सध्या जनरल मोटर्समध्ये कॉर्पोरेट फायनान्स उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत. त्या दि. १ सप्टेंबरपासून सीएफओ पदाचा कार्यभार स्वीकारतील. मूळच्या चेन्नई येथील सूर्यदेवरा जनरल मोटर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मेरी बारा यांना रिर्पोट करतील. मेरी बारा या २०१४ पासून कंपनीच्या CEO असून ऑटोमोबाइल क्षेत्रातील कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. दोन प्रमुख पदांवर महिला कार्यरत असलेली जनरल मोटर्स ही पहिली कंपनी बनली आहे.

दिव्या सूर्यदेवरा यांनी मद्रास विद्यापीठातून वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. वयाच्या २२ व्या वर्षी हार्वर्ड विद्यापीठातून एमबीए करून वयाच्या २५ व्या वर्षी त्या जनरल मोटर्सशी जोडल्या गेल्या. तत्पूर्वी त्या यूबीएस आणि प्राइस वॉटर हाऊस कूपर्समध्ये कार्यरत होत्या.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: