जगातील सर्वात प्रभावी युवांच्या यादीमध्ये ४ भारतीय

फॉर्च्यून नियतकालिकाने जगाच्या 40 सर्वात प्रभावशाली आणि प्रेरणादायी युवक-युवतींची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये भारतीय वंशाच्या पुढील 4 जणांना स्थान मिळाले आहे.

१) दिव्या सुर्यदेवरा –

फॉर्च्यूनच्या यादीत अमेरिकेतील सर्वात मोठी ऑटोमोटिव्ह कंपनी जनरल मोटर्सच्या मुख्य वित्तीय अधिकारी दिव्या सूर्यदेवरा चौथ्या स्थानावर आहेत. 39 वर्षीय दिव्या या जगाच्या कोणत्याही ऑटोमोबाईल कंपनीच्या पहिल्या महिला CFO ठरल्या आहेत.

२) अंजली सूद –

व्हिडिओ शेअरिंग संकेतस्थळ विमियोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली सूद या जागतिक यादीत 14 व्या स्थानावर आहेत. अंजली सूद 2014 मध्ये विमियो कंपनीशी विपणन प्रमुख म्हणून जोडल्या गेल्या होत्या. त्यांना मागील वर्षी कंपनीकडून सीईओपदी नेमण्यात आले. त्या विमिया प्लॅटफॉर्मला क्लाउडबेस्ड प्रोग्राममध्ये रुपांतरित करण्याच्या प्रयत्नात आहेत. यात चित्रफिती तयार करणे, शेअर करणे आणि त्याद्वारे युटय़ूबप्रमाणे पैसे कमविण्याची सुविधा देखील असेल.

३) अनू दुग्गल –

फीमेल फाउंडर्स फंड च्या संस्थापक  भागीदार अनू दुग्गल 32 व्या स्थानावर आहेत. 39 वर्षीय अनू यांनी महिलांच्या नेतृत्वाखालील टेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 2014 मध्ये हा वित्तकोष सुरू केला होता. प्रारंभी त्यांनी 50 लाख डॉलर्स जमविले. यंदा मे महिन्यापर्यंत त्यांनी 2.7 कोटी डॉलर्स गोळा केले आहेत. त्यांना निधी देणाऱयांमध्ये मेलिंडा गेट्स यांचाही समावेश आहे.

४) बैजू भट्ट –

रॉबिनहुडचे सह-संस्थापक आणि सह-मुख्य कार्यकारी अधिकारी बैजू भट्ट 24 व्या स्थानावर आहेत. वित्तीय सेवा देणारी कंपनी रॉबिनहुडची स्थापना बैजू यांनी वयाच्या 28 व्या वर्षी केली होती. 5 वर्षांनी त्यांच्या कंपनीचे मूल्य 5.6 अब्ज डॉलर्स इतके ठरविण्यात आले. यंदा त्यांच्या कंपनीने बिटकॉइन सारख्या अन्य क्रिप्टोकरंसीमध्ये देखील काम सुरू केले आहे.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: