चीनच्या समुद्रावर जगातील सर्वात मोठा पुल

चीनमधील झुहाई या ठिकाणी जगातला सर्वात मोठा सागरी पूल बांधण्यात आला आहे. हा पूल झुहाई, हाँगकाँग आणि मकाऊ या तिन्ही ठिकाणांना जोडतो.

झुहाई येथून हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी आजवर लागणार्या चार तासांऐवजी आता केवळ पाऊण तास लागेल.


संकल्पना –

२००३ मध्ये या पुलाची संकल्पना समोर आली होती. त्यानंतर प्रत्यक्षात २००९ मध्ये या पुलाच्या कामाला सुरुवात केली गेली आणि आता तो सामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे.


खर्च –

या पुलासाठी आलेला ७.३ अब्ज डॉलर इतका खर्च हाँगकाँग, झुहाई आणि मकाऊ या तिन्ही सरकारने मिळून केला आहे.


वैशिष्ट्ये –

हा पुल समुद्रापासून २२.९ किलोमीटर तर समुद्राच्या खाली ६.७ किलोमीटरवर आहे. या पूलाचे खांब बांधण्यासाठी ४ लाख टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे.

या पुलाला भूकंपाचा धोका उद्भवू नये यासाठी त्यात विशिष्ट यंत्रणा तयार करण्यात आली आहे. ८ रिश्टर स्केलचा भूकंप आला तरीही या पुलाला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले आहे.


Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: