चांद्रयान-२

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येत्या जानेवारी महिन्यात चांद्रयान-२ या अंतराळ यानाचे प्रक्षेपण करणार आहे.

चांद्रयान-२ या अंतराळ यानाचे जीएसएलव्ही-एमके-३-एम १ या प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

चांद्रयान-२च्या वजनामध्ये वाढ झाली असून आता ते ३.८ टन इतके झाले आहे, त्यामुळे चांद्रयान-२चे जीएसएलव्हीद्वारे प्रक्षेपण करता येणार नाही.

गरजेनुसार प्रक्षेपण यान अद्ययावत करून त्याला जीएसएलव्ही-एमके-३ असे स्वरूप देण्यात आले आहे.

सदर यानाचे प्रक्षेपण ३ जानेवारी ते १६ फेब्रुवारीदरम्यान करण्याचे ठरविण्यात आले आहे.

दक्षिण ध्रुवाच्या जवळ जाणारे हे जगातील पहिलेच अभियान आहे.

Important Points -

गगनयान २०२२ मध्ये सोडले जाणार आहे.

तीन भारतीय अवकाशवीर नियुक्त व प्रशिक्षित करून पाठवले जातील, ते ५-७ दिवस अवकाशात राहतील.

अवकाशवीरांसाठी स्पेससूट तयार आहे. त्यांना बंगळुरूत प्रशिक्षण दिले जाईल.

भारताचे पहिले अवकाशवीर राकेश शर्मा हे या मोहिमेचे सल्लागार असतील.

ही संपूर्णपणे स्वदेशी मोहीम असेल.

२०२२ मध्ये भारत हा मानवाला अवकाशात पाठवणारा रशिया, अमेरिका, चीन यांच्यानंतरचा चौथा देश ठरेल.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: