चांदीखोल आणि पदुर येथे उभारणार 6.5MMT क्षमतेचे पेट्रोलियम साठे

ओडिशा मधील चांदीखोल आणि कर्नाटक मधील पदुर येथे अतिरिक्त 6.5 दशलक्ष मेट्रिक टन (MMT) धोरणात्मक पेट्रोलियम साठे (SPR) उभारण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. चांदीखोल येथे भूमिगत पेट्रोलियम साठ्याची क्षमता 4 MMT तर पदुर येथील साठ्याची क्षमता 2.5 MMT एवढी राहणार आहे. 2017-18 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने दोन अतिरिक्त SPR ची घोषणा केली होती. सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प घेण्यासाठी ही तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.

ISPRL – Indian Strategic Petroleum Reserves Limited या संस्थेने कच्च्या तेलाच्या साठ्यासाठी 5.33 MMT क्षमतेचे तीन भूमिगतखडकाअंतर्गत साठे, विशाखापट्टणम (1.33) मंगलोर (1.5) आणि पदुर (2.5) येथे निर्माण केले आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: