[चर्चित व्यक्ती] प्रियांका चोप्रा: ‘’मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी ऑन फेसबुक”

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, हे सिध्द झालेलं आहे की, शंभर गुणांसह प्रियांका फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे.अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही यादी दिलेली आहे.

स्कोर ट्रेंड्सनी काढलेल्या मोस्ट एंगेजिंग फिमेल सेलिब्रिटीजच्या लिस्टमध्ये अव्वल प्रियंका चोप्रानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोण ९६ गुणांसह दुस-या स्थानी आहे. तर ‘बकेट लिस्ट’ सिनेमामुळे या यादीत तिस-या स्थानी ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित ६२ व्या गुणांसह पोहोचली आहे.

माधुरीनंतर मोस्ट एंगेजिंग महिला सेलिब्रिटीच्या यादीत सनी लिओनी चौथ्या स्थानी तर कॅटरीन कैफ पाचव्या स्थानी पोहोचलीय. नुकतेच बिग बी फेसबुकवर “मोस्ट एंगेंजिंग सेलिब्रिटी” झाले होते.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: