चर्चित व्यक्ती – न्या. नरेश हरिश्चंद्र पाटील

न्या. हरिश्चंद्र पाटील –

मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्या. नरेश हरिश्चंद्र पाटील यांची मुंबई उच्च न्यायालयाचे  मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

Image result for न्या. नरेश हरिश्चंद्र पाटील

न्या. मंजुळा चेल्लुर ४ डिसेंबर, २०१७ रोजी निवृत्त झाल्यापासून मुख्य न्यायाधीशांचे पद रिक्त आहे. काही महिने न्या. विजया ताहिलरामाणी प्रभारी मुख्य न्यायाधीश होत्या. परंतु त्यांची मुख्य न्यायाधीश म्हणून मद्रासला बदली झाल्यापासून न्या. हरिश्चंद्र पाटील प्रभारी मुख्य न्यायाधीश आहेत.

उच्च न्यायालयावर बाहेरच्या राज्यातून मुख्य न्यायाधीश नेमण्याची प्रथा असताना न्या. पाटील यांची नेमणूक केल्यामुळे ते या प्रथेला अपवाद ठरले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयास आपल्याच येथील न्यायाधीशांमधून मुख्य न्यायाधीश लाभण्याची सन १९९४ नंतरची ही दुसरी वेळ आहे. त्यावेळी न्या. सुजाता मनोहर यांना मुख्य न्यायाधीश म्हणून नेमले होते. त्यानंतर न्या. मनोहर केरळला मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयावर न्यायाधीश म्हणून गेल्या होत्या.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: