[चर्चित व्यक्ती] डॉ. कमलजित बावा

डॉ. कमलजित बावा यांना अलीकडेच वनस्पतिशास्त्रातील मानाचा लिनियन पुरस्कार मिळाला आहे.सध्या डॉ. बावा बंगळूरु येथील ‘अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी’ संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांचे संशोधन हे जैवविविधता व वनस्पतिशास्त्रातील आहे. विशेष म्हणजे लिनियन सोसायटी ऑफ लंडनचा हा पुरस्कार मिळालेले ते पहिलेच भारतीय वैज्ञानिक आहेत.

‘कन्झर्वेशन अॅण्ड सोसायटी’ नियतकालिक ‘इंडिया बायोडायव्हर्सिटी’ पोर्टल हे त्यांचे उपक्रम विशेष महत्त्वाचे आहेत. बावा यांचा जन्म पंजाबचा. उत्क्रांती जीवशास्त्रज्ञ, संवर्धन जीवशास्त्रज्ञ ही त्यांची मुख्य ओळख. अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अॅण्ड सायन्सचे ते सदस्य, तर रॉयल सोसायटीचे फेलो आहेत. पंजाब विद्यापीठातून बीएस व एमएस केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टन व हार्वर्ड विद्यापीठांतून शिक्षण घेतले. एकूण १८० शोधनिबंध त्यांनी लिहिले असून दहा पुस्तकांचे संपादन केले आहे.

‘सह्य़ाद्रीज इंडियाज वेस्टर्न घाट्स’ हा विशेषांक त्यांनी काढला होता. ‘हिमालया-माऊंटन्स ऑफ लाइफ’‘सह्य़ाद्रीज’ ही दोन पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. नॅशनल जिऑग्राफिक सोसायटीच्या समितीत त्यांनी काम केले असून त्यांना यापूर्वी गनरेस सस्टेनिबिलिटी अवॉर्ड, दी सोसायटी फॉर कॉन्झर्वेशनचा जीवशास्त्र पुरस्कार, ग्युजेनहेम फेलो, पी. एन. मेहरा स्मृती पुरस्कार असे मानसन्मान मिळाले आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: