[चर्चित व्यक्ती] कमलजीत बावा

भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ  कमलजीत एस. बावा यांनी वनस्पतीशास्त्रातला प्रतिष्ठित ‘लिनियन मेडल’ मिळवला आहे. हा सन्मान लंडनच्या लिनियन सोसायटीकडून दिला गेला.

‘लिनियन मेडल’ हा पुरस्कार सन 1888 पासून सुरू केल्यापासून डॉ. कमलजीत एस. बावा हे हा पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय आहेत. ते बंगळुरू येथील अशोक ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अँड द एनवायरनमेंट (ATREE) या ना-नफा संस्थेचे अध्यक्ष आहेत.

लिनियन मेडल हा सन्मान दरवर्षी लंडनच्या लिनियन सोसायटीकडून दिला जातो. लिनियन सोसायटी ही जीवशास्त्राशी संबंधित जगातली सर्वात जुनी सक्रिय संस्था आहे,जिची स्थापना सन 1788 मध्ये केली गेली. संस्थेचे नाव प्रसिद्ध स्वीडिश जीवशास्त्रज्ञ कार्ल लिनियस यांच्या स्मृतीत ठेवले गेले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: