चर्चित व्यक्ती – अरुंधती भट्टाचार्य

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) माजी प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने भट्टाचार्य यांची अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती केली.

१७ ऑक्टोबर २०१८पासून त्यांनी कार्यभार स्वीकारला असून अरुंधती भट्टाचार्य यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी असणार आहे.


अरुंधती भट्टाचार्य –

Image result for अरुंधति भट्टाचार्य मराठी

जन्म व शिक्षण –

भट्टाचार्य यांचा जन्म कोलकत्ता शहरातील एका बंगाली कुटुंबात झाला. त्यांनी शालेय शिक्षण सेंट जॅवियरच्या शाळा, बोकारो येथून पूर्ण केले. कोलकत्त्याच्या लेडी ब्रेबॉर्न कॉलेज आणि नंतर जादवपूर विद्यापीठात त्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला.


कार्यक्षेत्र –

भट्टाचार्य सप्टेंबर १९७७ मध्ये भारतीय स्टेट बँकेमध्ये कार्यरत होत्या. भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत. . भारतातील फॉर्च्युन इंडिया ५०० कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.

एसबीआय जनरल इन्शुरन्स, एसबीआय कस्टडीयल सर्व्हिसेस, एसबीआय पेन्शन फंड्स प्रा. लि. यांसारख्या अनेक नवीन व्यवसायांची त्यांनी सुरूवात केली.


प्रभावशाली व्यक्तिमत्व –

२०१६ मध्ये फोर्ब्स मासिकामध्ये अरुंधती भट्टाचार्य यांनी जगातील २५ व्या सर्वात प्रभावी महिलांमध्ये स्थान मिळवले. याच वर्षी त्यांना एफसी टॉप १०० ग्लोबल थिंकर्स फॉर फॉरेन पॉलिसी मॅगझिनमध्येही स्थान मिळाले होते.

फॉर्च्यून मासिकाकडून एशिया पॅसिफिकमध्ये चौथ्या सर्वात शक्तिशाली महिला म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला.

२०१७ मध्ये इंडिया टुडे मासिकाने २०१७ च्या यादीत भारतातील ५० सर्वात शक्तिशाली लोकांच्या यादीत भट्टाचार्य यांना १९ वे स्थान दिले.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: