[चर्चित पुस्तक] द स्पाय क्रॉनिकल्स : रॉ, आयएसआय अँड द इल्युजन ऑफ पीस

मोहम्मद असद दुर्रानी, रॉ चे माजी प्रमुख ए एस दुलत आणि पत्रकार आदित्य सिन्हा यांनी ‘द स्पाय क्रॉनिकल्स : रॉ, आयएसआय अँड द इल्युजन ऑफ पीस’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात दुर्रानी यांनी एका टप्प्यावर पाकिस्तान कुलभूषण जाधव यांची सुटका करु शकतो असे म्हटले आहे.

या पुस्तकात दुर्रानी यांनी लाल मशिदीचे ऑपरेशन फसल्याची कबुली दिली आहे तसेच ओसामा बिन लादेन कुठे आहे हे आयएसआयला ठाऊक होते. पण लादेन पाकिस्तानात हिरो असल्याने त्याला बाहेर काढायला आम्ही घाबरत होतो असे पुस्तकात म्हटले आहे.

  • २०१६ साली कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून अटक करण्यात आली.
  • पाकिस्तानी लष्कराने त्यांच्यावर दहशतवादी कारवाया आणि हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली खटला चालवला. १० एप्रिल २०१७ रोजी पाकिस्तानी कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.
  • भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली. १८ मे २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तानला जोरदार चपराक लगावत कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली. सध्या हे प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात आहे.
Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: