ग्रँड स्लॅम जिंकणारी पहिली जपानी खेळाडू

जपानी टेनिसपटू नामी ओसाका हिने ‘यूनायटेड स्टेट्स ओपन 2018’ या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरी प्रकाराचे जेतेपद पटकावले आहे. ग्रँड स्लॅम जिंकणारी पहिली जपानी खेळाडू ठरली आहे.

नामी ओसाका हिने अंतिम लढतीत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला हरवून हे ग्रँड स्लॅम जिंकले.

मिश्र दुहेरीचे विजेता –

जेमी मरे (ब्रिटन) आणि बेथानी मॅट्टेक-सॅंड्स (अमेरिका)

 

यूनायटेड स्टेट्‍स ओपन -

यूनायटेड स्टेट्‍स ओपन ही एक हार्ड कोर्ट टेनिस स्पर्धा आहे.

1881 सालापासून ही स्पर्धा खेळली जात आहे आणि जगातील सर्वात जुन्या स्पर्धांपैकी एक आहे.

हे एकमेव ग्रँड स्लॅम आहे, जे सामन्याच्या प्रत्येक फेरीमध्ये टायब्रेकर वापरते.

ही वर्षभारत खेळल्या जाणार्‍या चार ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी एक आहे.

 

इतर तीन ग्रँड स्लॅम –

१. ऑस्ट्रेलियन ओपन

२.फ्रेंच ओपन

३. विंबल्डन

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: