गुजरातमधील पहिल्या मेगा फूड पार्कचे उद्घाटन

केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते शाह आणि वासरावी (मंगरोल तालुका, जिल्हा सुरत) या खेड्यांमध्ये गुजरातच्या पहिल्या मेगा फूड पार्कचे उद्घाटन करण्यात आले आहे.

117.87 कोटी रुपयांच्या खर्चाने हा फूड पार्क उभारण्यात आला आहे. राज्यातला दुसरा फूड पार्क मेहसाणा जिल्ह्यात उभारण्यास मंजूरी दिली आहे.


भारत सरकारच्या मेगा फूड पार्क योजनेच्या अंतर्गत प्रत्येक मेगा फूड पार्क प्रकल्पाला 50 कोटी रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य दिले जात आहे.

मेगा फूड पार्क ही योजना “समूह” पध्दतीवर आधारित आहे.

पार्कमध्ये विशेषत: पुरवठा साखळीसाठी पायाभूत सुविधा, ज्यामध्ये संकलन केंद्रे, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, केंद्रीय प्रक्रिया केंद्रे, शीतसाखळी आणि उद्योजकांसाठी 30-35 पूर्ण विकसित भूखंडासकट अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्याची सोय असते.

मेगा फूड पार्क प्रकल्प स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) द्वारे चालवले जातात, जे कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत कॉर्पोरेट मंडळ असतात.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: