गुगल असिस्टंट मराठीमध्ये उपलब्ध

गुगल फॉर इंडियाचे चौथे एडिशन 28 ऑगस्ट रोजी दिल्लीत नुकतेच लॉन्च करण्यात आले आहे. गुगल फॉर इंडिया अंतर्गत त्यांनी ‘नवलेखा’ हा नवीन प्रकल्प भारतासाठी आणला आहे.

गुगलचे सिनीयर इंजिनिअरिंग डायरेक्टर प्रवीर गुप्ता यांनी गुगल असिस्टंट हे मराठीत सुरू होणार असल्याची घोषणा केली. आपल्याला कोणतेही प्रश्न विचारायचे असल्यास आपण ते मराठीत विचारू शकता.

तसेच आता मराठीसह इतर सात भाषांमध्ये गुगल असिस्टंट उपलब्ध होणार आहे. या आधी केवळ इंग्रजी किंवा हिंदीमधून प्रश्न विचारावे लागायचे.

यासह गुगल आता कर्जवाटपही करणार आहे. गुगलने एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा आणि फेडरल बँकेशी करार केला आहे. ‘गुगल पे’ च्या माध्यमातून ‘प्री अप्रुव्हड’ इन्स्टंट कर्जाचे वितरण केले जाणार आहे.

तसेच गुगल असिस्टंटवर आता रेल्वेचे लोकेशनही कळणार आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: