गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण उर्फ विजय काशीनाथ पाटील यांना राज्य सरकारतर्फे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार जाहीर झाला आहे. मैने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है, इ. सिनेमाला रामलक्ष्मण यांनी दिलेली गाणी हिट झाली आहेत.

संगीत आणि गायन क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या व्यक्तीस महाराष्ट्र सरकारतर्फे दरवर्षी ’गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार’ दिला जातो. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

यापूर्वी हा पुरस्कार पुष्पा पागधरे, माणिक वर्मा, श्रीनिवास खळे, गजानन वाटवे, दत्ता डावजेकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित हदयनाथ मंगेशकर, ज्योत्स्ना भोळे, आशा भोसले, अनिल विश्वास, सुधीर फडके, प्यारेलाल शर्मा, रवींद्र जैन, स्नेहल भाटकर, मन्ना डे, जयमाला शिलेदार, खय्याम, महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूर, सुलोचना चव्हाण, यशवंत देव, आनंद शहा, अशोक पत्की, कृष्णा कल्ले, प्रभाकर जोग, उत्तम ब्रिदपाल सिंग यांना देण्यात आला आहे.

 

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: