गणित क्षेत्रातील सर्वोच्च नोबल – ‘फिल्ड्स मेडल’

मूळ भारतीय गणितज्ज्ञ असलेल्या अक्षय व्यंकटेश यांचा ‘फिल्ड्स मेडल’ सन्मानानं गौरव करण्यात आला आहे.

अक्षय व्यंकटेश -

अक्षय व्यंकटेश हे मूळ भारतीय असले तरीही ते सध्या ऑस्ट्रेलियाचे नागरिक आहेत.

केवळ १३ व्या वर्षी त्यांनी ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’ मध्ये गणित आणि फिजिक्समध्ये डिग्री मिळवली होती.

३६ वर्षीय व्यंकटेश ‘नंबर थिअरी’मध्ये तज्ज्ञ आहेत.

अक्षय व्यंकटेश हे स्टॅनफोर्ड विश्वविद्यालयात प्रोफेसर आहेत. हा पुरस्कार पटकावणारे ते दुसरे मूळ भारतीय व्यक्ती ठरलेत.

त्यांच्यापूर्वी हा पुरस्कार २०१४ मध्ये मंजुल भार्गव यांना प्रदान करण्यात आला होता.

 

‘फिल्ड्स मेडल’ हा गणित क्षेत्रातला सर्वोच्च नोबल पुरस्कार मानला जातो.

चार वर्षांत एकदा फिल्डस मेडल ४० हून कमी वय असणाऱ्या उभरत्या गणितज्ज्ञांना दिला जातो.

१९३६ साली पहिला ‘फिल्ड्स मेडल’ पुरस्कार देण्यात आला होता.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: