‘मराठवाडय़ाचे गांधी’ – डॉ. गंगाप्रसाद अग्रवाल यांचे निधन

‘मराठवाडय़ाचे गांधी’ अशी ओळख असणारे डॉ. गंगाप्रसाद अग्रवाल यांचे वयाच्या ९६व्या वर्षी वृद्धापकाळाने वसमत येथील निवासस्थानी निधन झाले आहे.

जन्म व शिक्षण –

वसमत या गावी ७ जानेवारी १९२३ मध्ये गंगाप्रसादजींचा जन्म झाला. सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी उर्दू शाळेत घेतले. नंतर स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या योगेश्वरी विद्यालयातून मॅट्रिक आणि वर्धा येथील बियाणी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली.


त्यांचे समाजकार्य –

महाविद्यालयात शिकत असताना चले जावो चळवळी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबाद मुक्ती संग्रामात त्यांनी मोलाची कामगिरी केली.याच कालावधीत त्यांचे नाते महात्मा गांधी, विनोबा भावे आणि स्वातंत्र्यसंग्राम आणि भूदान आंदोलन याच्याशी जोडले गेले.

स्वातंत्र्योत्तर भारतात गांधीजींच्या कल्पनेतील स्वराज्य आणण्यासाठी झेंडा सत्याग्रह, जंगलतोड सत्याग्रह, १९६२ व ६५च्या युद्धाच्यावेळी शांतीसेनेचे कार्य, जयप्रकाश नारायण यांच्याबरोबर १९४२ ला आंदोलन, आणीबाणीच्या काळात १९ महिने तुरुंगवास, विनोबांच्या भूदान आंदोलनातील आघाडीचे शिलेदार, त्यानंतर दुष्काळाविरुद्ध झुंज अभियान, मराठवाडय़ाच्या पाणीप्रश्नासाठी  संघर्ष, भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन, बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यावर हिंदू-मुस्लीम ऐक्य व शांतता प्रस्थापन कार्य, जंगल-जमिनी यांचे ग्रामसभेला अधिकार मिळावेत यासाठीची लढाई अशी अनेक मोठी कामे त्यांच्या कार्ययादीत आहेत.


स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने त्यांना ‘डी.लिट.’ या मानद पदवीने गौरविले होते.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: