खेकड्याच्या 11 प्रजातींचा शोध

शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये खेकड्यांच्या ११ दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला आहे. तेजस ठाकरे यांनी यापूर्वीही खेकड्यांच्या 5 प्रजातींचा शोध लावला आहे. न्यूझीलंडच्या ‘‘झुटाक्सा’’ या नियतकालिकमध्ये आणि वेबसाईटवर तेजस ठाकरे यांच्या या दुर्मिळ खेकड्यांविषयी केलेलं हे दुसरे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. पश्चिम घाटातील ‘सह्याद्री’ या नावावरुन एका खेकड्याचे नाव ‘सह्याद्रियाना’ असे ठेवण्यात आले आहे.

 

या नवीन ११ खेकड्यांची नावे पुढीलप्रमाणे -

घाटियाना बोट्टी

घाटियाना पल्च्रा

घाटियाना रथब्युने

गुबेरनाटोरियाना लाँगीपेस

गुबेरनाटोरियाना मार्लेश्वरेनेसीस

गुबेरनाटोरियाना वालासेई

सह्याद्रियाना बिल्यारजानी

सह्याद्रियाना पाछेपालूस

सह्याद्रियाना सह्याद्रीनेसीस

सह्याद्रियाना टेन्यूफालस

सह्याद्रियाना वुडसासोनी

यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे जाऊन त्यांनी गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या पाच नव्या प्रजातींचा शोध लावला होता. या पाच प्रजातींना झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने नावे दिली होती.

५ खेकड्यांची नावे पुढीलप्रमाणे -

घातिमा अॅट्रोपर्पुरिआ

घातिआना स्प्लेन्डिडा

गुबेरनॉटोरिआना कल्कोकी

गुबेरनॉटोरिआना वाघी

गुबेरनॉटोरिआना ठाकरी

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: