कोलंबिया नाटोमध्ये “ग्लोबल पार्टनर” म्हणून सहभागी

कोलंबिया हा देश नाटोमध्ये “ग्लोबल पार्टनर” म्हणून सहभागी झाला आहे. “ग्लोबल पार्टनर” म्हणून सहभागी होणारा कोलंबिया हा लॅटिन अमेरिकेतील पहिला देश ठरला आहे. याबाबतची घोषणा कोलंबियाचे राष्ट्रपती जुआन मॅन्युअल सांतोस यांनी केली. ही घोषणा कोलंबियाला OECD चे सदस्यत्व मिळाल्याचे निश्चित झाल्यावर करण्यात आली.

या पार्टनरशिपबरोबरच कोलंबिया हा अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इराक, जपान, कोरिया गणराज्य, मंगोलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.

या पार्टनरशिपमुळे कोलंबिया नाटोच्या लष्करी कारवायांमध्ये सक्रियपणे सहभागी होणार नसला तरी, नाटो या संघटनेचा अधिकृत सदस्य असेल. सायबर सुरक्षा, सागरी सुरक्षा, दहशतवाद, संघटित गुन्हेगारी या क्षेत्रामध्ये नाटो आणि कोलंबिया एकमेकांना सहकार्य करतील.

नाटो ही उत्तर अमेरिकेतील व युरोपमधील २९ देशांची संघटना आहे. ती बहुराष्ट्रीय लष्करी युती आहे. ४ एप्रिल १९४९ रोजी नॉर्थ अटलांटिक करारान्वये (North Atlantic Treaty) ही संघटना अस्तित्वात आली आहे. या संघटनेचे मुख्यालय बेल्जीयममधील ब्रुसेल्स येथे आहे. जगातील एकूण संरक्षण खर्चापैकी ७० टक्के खर्च नाटो सदस्यांकडून करण्यात येतो.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: