कोकणात समुद्रात बंधारा घालून बंदर करण्याचा प्रस्ताव

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या 12 महत्वाच्या क्षेत्रातील उपक्रमांमध्ये कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या निवती-मेढा येथे बंधारे बंदर प्रकल्प समाविष्‍ट करण्यात आला आहे.

या भागात सध्या असे बंदर नसल्यामुळे मच्छिमारांच्या उपजीवीकेवर मोठा परिणाम होत आहे. हे मच्छिमार पूर्णत: निसर्ग आणि समुद्रावर अवलंबून आहेत. त्यामुळे कठीण परिस्थितीत त्यांना समुद्रात मासेमारी करायला जाता येत नाही. हे बंदर झाल्यास विपरित स्थितीतही मच्छिमार मासेमारीसाठी जाऊ शकतील. तसेच या बंदरावर क्रुझ शीपचा धक्का असेल त्यामुळे या भागात पर्यटन उद्योगालाही चालना मिळेल. बंदराशी निगडीत इतर उपक्रमही या ठिकाणी सुरु होतील आणि पर्यायाने येथील स्थानिकांचे जीवनमान सुधारेल अशी अपेक्षा आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: