कोकणच्या हापूस आंब्याला GI मानांकन

कोकणाच्या हापूस आंब्यालाला नुकतेच GI मानांकन मिळाले आहे. या मानांकनामुळे हापूसच्या मूळ उत्पादनाची जागा, त्याची चव, दर्जा याबद्दलची मान्यता मिळाली असल्याने हापूसला स्वत:ची ओळख मिळाली आहे.

2008 पासून कोकणच्या हापूसला जीआय मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले होते. मात्र या प्रस्तावाला अनेक हरकती आल्यामुळे कोकणच्या हापूसचे GI मानांकन रखडले होते.

अखेर 3 ऑक्टोबरला कोकण कृषी विद्यापीठाच्या नावानं हापूसला भौगोलिक निर्देशनाचे मानांकन प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

GI प्रमाणपत्र मिळालेलय फळांच्या यादीत हापूस आंबा 139 व्या क्रमांकावर आहे.

जीआय (GI) मानांकन –

विशिष्ट भूभागातील माती, पाणी आणि वातावरणामुळे, तसेच शेतकऱ्यांच्या व्यवस्थापन कौशल्यातून शेतीमालास रंग, वास, चव, आकार आदी गुणवैशिष्ट्यांमध्ये वेगळेपण लाभते. अशा दर्जाची खात्री मात्र ‘GI’ अर्थात ‘भौगोलिक निर्देशन’ मानांकनातून मिळते.

भौगोलिक निर्देशन (GI) अधिकारांतर्गत उत्पादनांची क्षमता, दर्जा आणि इतर वैशिष्ट्यांचा समावेश होतो. हस्तकला आणि कापड उत्पादने, कृषी उत्पादने, तसेच तयार वस्तू यांना विविध पातळींवर उत्पादनाचा दर्जा आणि अन्य बाबींमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते. मात्र भौगोलिक निर्देशनाचे अधिकार मिळाल्यास त्या उत्पादनांचा दर्जा, भौगोलिकदृष्ट्या पीक उत्पादनाचे क्षेत्र, विभाग, देश आदींबाबत विश्वासार्हता निर्माण होते.


जीआय मानांकनामुळे होणारे फायदे –

१) शेतीमालास प्रतिष्ठा प्राप्त होते.

२) शेतीमालाची नेमकी ओळख तयार होते.

३) या मानांकनामुळे त्या उत्पादनाच्या  गुणवत्तेची खात्री मिळते.

४) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उत्पादनाच्या व्यापारासाठी संधी सहज मिळून जाते.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: