कृषी वैज्ञानिकांच्या भर्ती मंडळाची पुनर्रचना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने कृषी वैज्ञानिकांच्या भर्ती मंडळाच्या (ASRB) पुनर्रचनेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

रचना –

ASRB मध्ये आता तीन सदस्याऐवजी चार सदस्‍य (एक अध्‍यक्ष आणि  तीन सदस्‍य) असतील.

ASRB सदस्यांचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत,जे आधी होईल तोपर्यंत असेल.

स्‍वायत्‍तता, गोपनीयता, उत्‍तरदायित्‍व आणि  ASRB (Agricultural Scientists Recruitment Board) च्या प्रभावी कामकाजासाठी त्याला ICAR (Indian Council of Agricultural Research) पासून वेगळे केले जाईल आणि  कृषि आणि  शेतकरी कल्‍याण मंत्रालयाअंतर्गत कृषि संशोधन आणि शिक्षण विभागाशी जोडले जाईल.

ASRB ची वित्तीय तरतूदही आयसीएआरपासून वेगळी करून कृषी संशोधन आणि शिक्षण  विभागांतर्गत आणली जाईल.ASRB सचिवालयात स्वतःचे  प्रशासकीय कर्मचारी असतील आणि स्वतंत्र प्रशासकीय नियंत्रण असेल.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: