‘कूलिंग अॅक्शन प्लान’

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ‘कूलिंग अॅक्शन प्लान’ नावाची योजना जाहीर केली आहे. मंत्रालयाने प्रधान मंत्री कौशल विकास योजना (PMKVY) – कौशल्य भारत अभियान अंतर्गत कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या (MSDE) सहकार्याने हा एक महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे.

‘कूलिंग अॅक्शन प्लान’ योजना जाहीर करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.

योजनेची उद्दिष्टे –

१. राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान कार्यक्रमाच्या अंतर्गत “कूलिंग अँड रेलटेड एरिया” याला मान्यता देणे.

२. सन 2037-38 पर्यंत 20%-25%नी क्षेत्रामधील शीतकरण मागणी कमी करणे.

३. सन 2037-38 पर्यंत 25%-30%नी शीतकारकांची (refrigerant) मागणी कमी करणे.

४ सन 2037-38 पर्यंत 25%-40%नी कूलिंग एनर्जीची आवश्यकता कमी करणे.

५. 100,000 रेफ्रिजरेशन आणि वातानुकूलित (AC) सर्व्हिसिंग तंत्रज्ञांचे कौशल्य अद्ययावत करणे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: