कुलगौड – देशातील सर्वात विकसित खेडे

ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, कर्नाटक राज्यातील कुलगौडा हे खेडे देशातील सर्वात विकसित असलेले खेडे आहे.

अहवालानुसार, देशातील ९७ ग्रामपंचायतींना समान गुण मिळाल्यामुळे पहिल्या १० विकसित खेड्यांच्या यादीत स्थान मिळाले असून यापैकी सर्वाधिक ग्रामपंचायती(३७) आंध्र प्रदेशमधील आहेत. या खालोखाल तामिळनाडू राज्यातील २४ ग्रामपंचायतींचा समावेश झाला आहे.


या सर्व्हेक्षणासाठी पुढील बाबींचा विचार करण्यात आला होता –

१) गावातील पायाभूत सुविधा

२) आर्थिक विकास व जीवनमान

३) सिंचनसुविधा

४) आरोग्य

५) पोषण आणि स्वच्छता

६) महिला सशक्तीकरण

७) आर्थिक समावेशन


अहवालातील काही महत्वाच्या बाबी –

१) ९५% पेक्षा अधिक खेड्यांमध्ये घरगुती वापरासाठी वीज उपलब्ध आहे.

२) केवळ ५८% खेडे हागणदारी मुक्त घोषित केलेले आहेत.

३) केवळ २१% खेड्यांमध्ये एक सामायिक कचरा व्यवस्थापन प्रणाली अस्तित्वात आहे.

४) सुमारे ७५% पेक्षा जास्त घरांमध्ये LPG व बायोगॅस सारख्या स्वच्छ ऊर्जेचा वापर होत नाही.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: