कुपोषणाच्या समस्येसाठी भारत सरकारची नवी मार्गदर्शक तत्वे

राष्ट्रीय पोषण तंञात्मक मंडळाने (NTBN) देशातल्या गंभीर तीव्र कुपोषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी महिला व बाल विकास मंत्रालयाकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या मार्गदर्शकांना त्यांची मंजुरी दिली आहे.

प्रस्तावित शिफारसी पुढीलप्रमाणे आहेत –

१. गंभीरपणे कुपोषित बालकांना स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले धान्य, डाळी आणि भाज्यांमधून तयार केलेले ताजे शिजवलेले अन्न अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून वितरित करणे.

२ जीवनाविषयक वैद्यकीय गुंतागुंत विकसित झालेल्या अत्यंत कुपोषित बालकांना रुग्णालयात दाखल करणे. हे एकमेव निर्देश 2011 सालापासून पाळले जात आहे.

३. गंभीर कुपोषित बालकांची ओळख पटविणे आणि त्यांना एडीमा (सूज) किंवा वैद्यकीय गुंतागुंत असलेल्यांपासून वेगळे करणे आणि त्यांना जवळच्या आरोग्य सुविधा किंवा पोषण पुनर्वसन केंद्राकडे पाठवणे. अशा कार्यांच्या बाबतीत अंगणवाडी कामगार आणि ऑक्झिल्लरी नर्स मिडव्हाइव्ह्ज (ANM) यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

४. अंगणवाडी कर्मचारी 3-6 वर्षे वयोगटातल्या सर्व बालकांना सकाळची सुधारित न्याहारी, गरम शिजविलेले अन्न पुरविणार तसेच गंभीर तीव्र कुपोषित बालकांसाठी घरासाठी अन्नधान्य पुरविणे.

५. देशातल्या गंभीर तीव्र कुपोषणाने ग्रसित बालकांच्या पौष्टिकत्व व्यवस्थापनासाठी देशाच्या हे पहिले दिशानिर्देश आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-4 अनुसार, वय वर्ष 5 खालील बालकांमध्ये 7.5% (सुमारे 8 दशलक्ष) कुपोषणाच्या विळख्यात आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: