काठमांडूमध्ये ‘BIMST-EC’ संमेलनाला सुरुवात

बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन (BIMST-EC) संमेलनाला काठमांडूमध्ये सुरुवात झाली आहे.

दोन वर्षांपूर्वी गोव्यात (भारत) बिम्सटेक संमेलन आयोजित केले होते. या वर्षी नेपाळने या संमेलनाचे आयोजन केले आहे.

BIMST-EC या संघटनेची स्थापना २१ वर्षांपूर्वी ६ जून १९९७ रोजी बांगलादेश, भारत, श्रीलंका आणि थायलंड या चार देशांकडून BIST-EC या मूळ नावाने करण्यात आली होती.

कालांतराने, डिसेंबर १९९७ मध्ये म्यानमार देशाने या संघटनेचे सदस्यत्व स्वीकारल्यामुळे BIST-EC या मूळ नावात बदल करून ते BIMST-EC असे करण्यात आले.

त्यानंतर फेब्रुवारी २००४ मध्ये नेपाळ आणि भुतानने या संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले.

२००८ पासून नेपाळ हा देश BIMST-EC संघटनेवर निरीक्षक म्हणून कार्यरत आहे.

सध्या बांगलादेश, भूटान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड हे सात देश BIMST-EC चे सदस्य आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: