एसटी प्रवासी भाड्यात18 टक्के भाडेवाढ

एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बससेवेच्या प्रवासी भाड्यामध्ये  दि. 15 जूनच्या मध्यरात्रीपासून 18 टक्के भाववाढ करण्यात आली आहे.  त्याचबरोबर तिकिटाची भाडे आकारणी पाच रुपयांच्या पटीत करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. म्हणजे एखाद्या प्रवासाचे तिकीट सात रुपये असेल तर त्याऐवजी पाच रुपये आकारले जातील. आठ रुपये तिकीट असल्यास 10 रुपये भाडे आकारले जाईल.

मोटार वाहन कायदा 1988 नुसार शासनाला भाडेदर ठरवण्याचा अधिकार आहे. शासन निर्णय क्रमांक एचटीसी 1099/451/प्र. क्र 21 परिपत्रक 1 ता. 16 एप्रिल 1999 अन्वये भाडेवाढीचे सूत्र शासनाने मान्य केले आहे. या सुत्रानुसार भाडेवाढ करण्याचे अधिकार महामंडळाला देण्यात आले आहेत. यापूर्वी 31 जुलै व 22 ऑगस्ट 2014 ला दोन टप्प्यांत मिळून एसटीची 13 ते 15 टक्के भाडेवाढ झाली होती.

 

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: