उसापासून इथेनॉल निर्मिती करण्याला केंद्र सरकारची परवानगी

साखर कारखान्यांना यापुढे उसाच्या रसापासून अथवा बी मोलॅसिसद्वारे थेट इथेनॉल निर्मिती करता येणार आहे. कारण उसापासून थेट इथेनॉल तयार करण्याला केंद्र सरकारने साखर कारखान्यांना परवानगी दिली आहे.

यावर्षी देशातील साखरेचे उत्पादन 355 लाख टन होईल असा अंदाज आहे. त्यातच मागील हंगामातील साखरही खूप शिल्लक आहे. त्यामुळे इथेनॉल प्रकल्प वाढविणे हाच त्यावर पर्याय आहे.

त्यासाठी इथेनॉल प्रकल्प देशात वाढावेत म्हणून सहा हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्जदेखील पाच वर्षांसाठी उपलब्ध करून दिले आहे.

त्यानुसार महाराष्ट्रात 35 ते 40 तर देशात 114 प्रकल्प सुरू होणार आहेत.


देशात पेट्रोलमध्ये 10 टक्‍के इथेनॉल मिसळण्याला परवानगी आहे. परंतु, पुरेशा प्रमाणात इथेनॉलची उपलब्धता नसल्याने सध्या फक्‍त चार टक्‍केच इथेनॉल मिसळले जाते.
इथेनॉलला मिळणारे वाढीव दर 1 डिसेंबरपासून लागू होणार आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: