उद्योगसुलभतेत भारत ७७ व्या क्रमांकावर

जागतिक बँकेने नुकताच उद्योगसुलभता क्रमवारी संबंधित एक महत्वाचा अहवाल जाहीर केला आहे.

जागतिक बँकेच्या या उद्योगसुलभता क्रमवारीत भारताने ७७ क्रमांकावर स्थान मिळवले आहे. जागतिक बँकेच्या २०१९च्या या अहवालातील ही क्रमवारी ठरवताना दिल्ली आणि मुंबई या दोन औद्योगिक-वित्तीय शहरांचा विचार करण्यात आला आहे.


गेल्या वर्षी भारत १००व्या क्रमांकावर होता.


व्यवसाय अनुकूल देशांमध्ये न्यूझीलंड सर्वोच्च स्थानी असून सोमालिया या यादीमध्ये अगदी शेवटच्या क्रमांकावर आहे.


वस्तू आणि सेवा कर, दिवाळखोरीसंदर्भातील नवा कायदा, कंपनी करांमध्ये झालेली कपात उद्योगसुलभतेत वाढ करणारी ठरली, असे जागतिक बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.


प्रामुख्याने उद्योग पायाभरणी, बांधकाम परवाना, वीजपुरवठा, पतपुरवठा, विदेशी व्यापार आणि कंत्राट अंमलबजावणी, यात देशाची क्रमवारी उल्लेखनीय वाढली आहे.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: