उद्यम अभिलाषा जागृती अभियान

महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारतीय लघु विकास बँकेने (SIDBI) राष्ट्रीय पातळीवर स्वयम उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी ”उद्यम अभिलाषा” हे अभियान चालू केले आहे.

नीती आयोगाने २८ राज्यांमधील ओळखलेल्या विकास आकांक्षीत ११५ जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबवले जाणार असून त्या अंतर्गत १५,००० युवकांपर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट आहे.

३ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात हे अभियान राबवले जाणार आहे.

SIDBI ने यासाठी CSE प्रशासन सेवा या विशेष सरकारी संस्थेशी भागीदारी केली आहे.

या अभियानाच्या अंतर्गत स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरु करण्याची इच्छा असलेल्या मागास भागातील युवकांना ८०० प्रशिक्षक उद्योगविषयक प्रशिक्षण देतील.

भारतीय लघु उद्योग विकास बँक हि भारतातील प्रमुख आर्थिक विकास संस्था असून उत्तरप्रदेशातील लखनऊ येथे त्याचे मुख्यालय आहे.

२ एप्रिल १९९० रोजी भारत सरकारने भारतीय लघु उद्योग विकास बँक स्थापन केली आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: