उदयम संगम -२०१८

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २७ जून,२०१८ रोजी उदयम संगम -२०१८ चे उदघाटन केले आहे. यावेळी राष्ट्रपतींनी सौर-चरखा अभियान  व MSME  संपर्क पोर्टलचेही उदघाटन केले.

उदयम संगम -२०१८

२७ जून रोजी पार पडलेल्या दुसऱ्या संयुक्त राष्ट्र सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग दिनाच्या निमित्ताने केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम मंत्रालयाने उदयम संगम -२०१८ चे आयोजन केले होते.

MSME संपर्क पोर्टल –

या पोर्टलमुळे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी व प्रशिक्षित युवकांना MSME क्षेत्रातील रोजगार संधीची माहिती देण्यासाठी मदत होणार आहे.

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME ) –

MSME क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. रोजगारनिर्मितीबाबत कृषी क्षेत्रानंतर MSME क्षेत्राचा दुसरा क्रमांक लागतो.

संयुक्त राष्ट्र सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग दिन २०१७ पासून युनोने २७ जून हा दिवस दरवर्षी संयुक्त राष्ट्र सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे.

युनोच्या मते,

अ. क्र. उद्योग  कामगारांची संख्या  दशलक्ष युरो पेक्षा कमी उलाढाल 
1 सूक्ष्म 10 2
2 लघु 50 10
3 मध्यम 250  50
Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: