उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विद्यापीठ कायद्यात सुधारणा करून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी असा नामविस्तार करण्याचे विधेयक विधानसभेमध्ये मांडले.

बहिणाबाई चौधरी-

बहिणाबाई नथुजी चौधरी या मराठी साहित्य विश्वातील महान कवयित्री आहेत.

निरक्षर बहिणाबाईंना काव्य प्रतिभेची उपजत देणगी होती.

दैनंदिन घरकाम, शेती करताना त्या उत्स्फूर्तपणे ओव्या, म्हणी म्हणत गात असत.

अशिक्षित असून सुध्दा त्या साध्या भाषेत अहिराणी गाणी व काव्याचे रचना करीत असत. बहिणाबाईंच्या कविता वऱ्हाडी-खानदेशीत, त्यांच्या मातृबोलीत, रचिलेल्या आहेत.

त्यांच्या कवितांद्वारे अडचणीच्या प्रसंगी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कसे जगावे, याचे शिक्षण दिले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: