उत्तराखंडच्या रणजी संघाला बीसीसीआयची मान्यता

बीसीसीआयने सुमारे १८ वर्षानंतर उत्तराखंडच्या रणजी संघाला मान्यता दिली आहे. उत्तराखंडमधील क्रिकेटची प्रगती पाहण्यासाठी बीसीसीआयने एका 9 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. वरील 9 सदस्यीय समितीमध्ये सहा विविध राज्यांच्या संघटनांचे सदस्य, एक उत्तराखंड सरकारचा प्रतिनीधी, दोन बीसीसीआयच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. याआधी ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मणिपूर, नागालँड आणि मेघालय या 5 राज्यांनी आगामी रणजी करंडक स्पर्धेत आपला स्वतंत्र संघ उतरवणार असल्याची माहिती दिली आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: