‘ई-विद्या भारती’ आणि ‘ई-आरोग्य भारती’

भारताचे परराष्ट्र कल्याण मंत्रालय आणि भारतीय दूरसंचार सल्लागार मर्यादित (TCIL) यांच्या दरम्यान नवी दिल्ली येथे ‘ई-विद्या भारती’ आणि ‘ई-आरोग्य भारती’ नेटवर्क प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भात एक करार करण्यात आला आहे.

या कराराच्या मदतीने भारत आफ्रिकेच्या राष्ट्रांच्या विकासामध्ये हातभार लावण्यासाठी आफ्रिकेत ज्ञानार्जनामधील अंतर कमी करण्यासाठी तसेच शिक्षण व आरोग्य सेवांच्या क्षेत्रात क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी संबंध प्रस्थापित करणार आहे.

भारतीय दूरसंचार सल्लागार मर्यादित -

भारतीय दूरसंचार सल्लागार मर्यादित(Telecommunications Consultants India Limited -TCIL) ही एक मिनी रत्न श्रेणी l चे शासकीय उपक्रम आहे.

भारतीय दूरसंचार सल्लागार ही कंपनी भारत सरकारच्या दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत दूरसंचार विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली चालवले जाते. याची स्थापना 1978 साली करण्यात आली असून यामध्ये मध्य-पूर्व, आफ्रिका आणि युरोप येथील सुमारे 45 देशांमध्ये उपस्थित आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: